बिजापूरमध्ये २४ नक्षलवादी शरण   

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सोमवारी २४ नक्षलवादी पोलिसांना शरण आले. यातील १४ नक्षलवाद्यांवर २८.५० लाखांचे बक्षीस जाहीर होते. छत्तीसगढ- तेलंगणाच्या सीमेवरील भागात २१ एप्रिलपासून २४ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी नक्षलविरोधी मोहिमेत आहेत. काल शरण आलेल्या २४ नक्षलवाद्यांमध्ये ११ महिला नक्षलवादी आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
सुद्रू हेमला आणि कमली मोदियम उर्फ उर्मिला यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. जयमोती पुनेम आणि मंगू पुनेम यांच्यावर अनुक्रमे ३ लाख आणि ५० हजारांचे बक्षीस होते. शामनाथ कुंजम, चैतू कुरसम, बुच्ची माडवी उर्फ रोशनी, सुखमती उर्सा आणि सोमली हेमला यांच्यावर प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस होते. तर बुज्जी पदम , सुक्को पुनेम (२८), हिडमे वेको आणि सोमली (२२०) आणि सोमली (२३) यांच्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते, असेही ते म्हणाले.

Related Articles